रत्नागिरी : पोलीस स्थानकाच्या हद्दीत सुरु असणाऱ्या हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आणि त्या ठिकाणी रोख रुपये व हातभट्टीची दारू पकडण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्णगड बाजारकरवाडी येथील गावठी दारु धंदा सुरु होता याची माहिती पोलीस मुख्यालयाला मिळाल्यानंतर पूर्णगड सागरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दत्ताराम कृष्णा नार्वेकर (वय ६६) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई मंगळवार दुपारी ३.१५ च्या सुमारास करण्यात आली असून संशयित गावठी हातभट्टीची दारु विकत असताना पोलीस अंमलदार सोनल शिवलकर यांनी यांनी धाड टाकून ही दारू पकडली.