पैठण तालुक्यात ठिकठिकाणी अण्णा भाऊ साठे जयंती साजरी..

पैठण प्रतिनिधी/

पैठण तालुक्यातील ग्रामीण भागातील हजारो कार्यकर्ते आणि शहरातील अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समीती च्या वतीने विद्रोही साहित्य, पोवाडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रभाव टाकणारे कवने भीमगीते, लेझीम पथकाचे प्रात्यक्षिके, छडिपट्टा, विविध शाळेत शालेय साहित्य वाटप, अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान, आणि चितेगाव ते पैठण अशी  तीस किलोमीटर लांबीची मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

या  तीस किलोमीटर च्या रॅलीत कसलाही अनुचित घटना किवा प्रकार घडू नये म्हणून संयोजक नामदेव शरणागत,अविनाश मिसाळ यांनी अनेक स्वयंसेवक तैनात केले होते. तरीही पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ विशाल नेहुल पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बिडकीन पोलीस ठाण्याचे स पो नि संतोष माने, औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे स पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे आणि पैठण पैठण ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तीस किलोमीटर चा चोख बंदोबस्त ठेवला होता. ह्या रॅलीत ५००  च्या  आसपास दुचाकी होत्या तर  एक हजार युवक सवारी करत होते. 

चितेगाव, बिडकीन, ताहेरपुर कवडगाव, ढोरकीन, पिंपळवाडी आणि कातपुर अशा ठिकाणी या रॅलीचे विलास बापू भुमरे, जेम्स अंबिलढगे, संत  एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन पाटील घायळ जि प सदस्य साईनाथ सोलाट, अनिल रोडे, सरपंच मनिषा दहिहंडे, उपसरपंच महमूद टेलर कातपुर चे सरपंच धनंजय पाटील मोरे, तर बसवेश्वर चौकात सौ अनिता नानासाहेब दाभाडे, सौ सुनिता आव्हाड, सौ रुपाली सोळसे भुयागळे, यांनी संयोजन समितीचे सदस्य चा सत्कार केला आणि  अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. रॅली पैठण शहरात आल्यावर भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्पहार घातला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्पहार

 घातला आणि नगराध्यक्ष सुरज लोळगे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, उत्सव समितीचे अध्यक्ष दिनेश खंडागळे, मा नगराध्यक्ष राजू गायकवाड, रमेश शिंदे, अविनाश मिसाळ, अमोन आव्हाड, संदीप चौतमल, या मान्यवरांनी अभिवादन करून मार्गदर्शन केले.या भव्य जयंती उत्सव साजरा करण्यासाठी सकल मातंग समाजातील युवक कार्यकर्ते सर्व श्री रवींद्र गायकवाड, धर्मराज मिसाळ, रविंद्र मिसाळ, अंकुश मिसाळ लक्ष्मण ताकवले, अरुण नाडे, अरुण आव्हाड, सुमीत नाडे, भगवान मिसाळ, अजय शरणगत, विजय शरणगत, विजय आव्हाड, बाबासाहेब हतागळे, विजय वामन सुरेश गवळी, द्रविड भाऊ आव्हाड, हर्षवर्धन आव्हाड,  घोरपडे, सुरज आहीरे, सालुमन सुर्यवंशी, जयेश घुले, यांनी कठोर परिश्रम घेतले.