कोरेगाव भिमा: सणसवाडी (ता.शिरुर) येथील बहुजन चळवळीसह सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे उल्लेखनीय काम करणारे सामाजिक कार्यकर्ते लखनभाऊ लोंढे यांची महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली असुन,त्यांच्या निवडीबद्दल संघर्ष फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे वतीने जाहिर सत्कार करण्यात आला, याप्रसंगी शिवराय, फुले, शाहु, आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला पथारी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष आबासाहेब शिंदे,पथारी सुरक्षा दलाचे वरिष्ठ पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष सोनवणे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अनिल पाटोळे, झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या महिला नेत्या निलमताई सोनवणे आदि मान्यवर प्रमख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
यावेळी संघर्ष फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,प्रदेश कार्याध्यक्ष तथा राज्य प्रवक्ते पञकार रिजवान बागवान, राज्य सचिव शितलकुमार गाजरे पाटील, कामगार नेते निलेश धुमाळ पाटील, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ घोडके, बापु निकुंभ, माऊली गायकवाड, विष्णु इंगळे, किरण लांडगे, विशाल रुके, शशिकांत चव्हाण, अनिल पवार, सुरेश शेलार, आण्णा कुसेकर, सुधाकर मंजुळे, गणेश साळुंके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आबासाहेब शिंदे,संतोष सोनवणे, बोध्दाचार्य विश्वनाथ घोडके, निलेश धुमाळ आदिंनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पञकार रिजवान बागवान यांनी केले,तर आभार बाळासाहेब गायकवाड यांनी मानले.