संगमेश्वर : तालुक्यातील कुळ्ये वाशी गावात वाघाची शिकार या सदरात वृत्तपत्र व डिजीटल मिडीयात वृत्त प्रसारित होवून त्यात वन विभागाचे दुर्लक्ष व बघ्याची भुमिका असे वृत्त प्रसारीत करण्यात आले. त्यावर वन परिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी प्र. ग. सुतार यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे या तथाकथित घटनेशी वन विभागाचा संबध नसताना वन विभागाला दोषी धरणे चूक असल्याचे सांगून सदर शिकार झाल्याचे निनावी पत्र संगमेश्वर पोलिसांना प्राप्त झालेने संगमेश्वर पोलिसांनी त्या पत्राचे आधारे तपास सुरू केला. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२नुसार पोलिसांना (पोलिस निरीक्षक दर्जाचे) काही माहीती समजली तर तपासाचे अधिकार आहेत.

या अधिनियमाच्या आधारे संगमेश्वर पोलीस तपास करीत आहेत. वाशी च्या तथाकथित प्रकरणात वन विभागाचा काही संबध येत नाही. ज्याने निनावी पत्र दिले ते पोलिसांच दिले.. वन विभागाला दिलेेले नाही.. पोलिसांनी वन विभागला फक्त फोन करून माहीती दिली. वन विभागाने लगेच वनपाल तौफिक मुल्ला यांनी आपले सहकारी व पोलिसांसह जावून वाशी गावात पाहणी केली. तसेच आवश्यक ती मदत केली आहे. संगमेश्वर पोलिसांनी त्यांना रात्रौ १०वा. पोलिस स्थानकात आलेवर परत जायला सांगितले. वन विभागाला काही ही लेखी दिले नाही व परत बोलावलेले नाही. पोलिस तपास करत असलेने वन विभागाचा या तपासात काही संबध व दोष नसताना हि अशा बातम्याने वन विभागाची प्रतिमा नाहक मलिन झालेली आहे. संगमेश्वर पोलिसांना तपास कार्यात मदतीची गरज लागल्यास देवरूख वनपाल मदत करीत आहेत, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे..