औरंगाबाद : अपायकारक वस्तुंच्या विक्री प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करुन आरोपीला जामीन मिळवून देत न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या भामट्या जामीनदाराला वेदांतनगर पोलिसांनी अटक केली . शंकर बाळुबा घनघाव ( २५ , रा . घर क्रं . २३ , गल्ली नं .२ , हिनानगर , चिकलठाणा ) असे आरोपीचे नाव आहे . त्याला 17 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम . आर . देशपांडे यांनी दिले . काय आहे प्रकरण ? प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायलयाचे अधिक्षक नितीन मराठे यांनी फिर्याद दिली . त्यानूसार , १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.४५ वाजेच्या दरम्यान वकील यांच्या मार्फत आरोपी शंकर घनघाव हा कलम २७३ प्रकरणातील एका आरोपीच्या जामीनसाठी आला होता . त्यांनी त्याचा फोटो आणि कागदपत्रे कोर्टात जमा केली . सदर व्यक्तीने या आधी एकाची जामीन घेतल्याचा संशय त्याच्या फोटोवरून कोर्टाच्या कर्मचाऱ्याला आला . या प्रकरणी जिल्हा अधिक्षक नितीन राजेश मराठे यांनी कोर्टातील दस्तावेजाची तपासणी केली असता , शंकर घनघाव या व्यक्तीने ६ जुलै २०२२ ला संजय देवीदास शेळके ( रा . हमालवाडा , रेल्वे स्टेशन ) या नावाने कलम २३१/२०१८ मधील एमआयडीसी वाळुज खटल्यातील जामीनदार राहिल्याचे समोर आले . ताब्यात घेतले सदर प्रकरण समोर आल्यानंतर कोर्ट डयुटीसाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले . बनावट कागदपत्राच्या आधारे जामीन घेणाऱ्या शंकर बाळुबा घनघाव याला वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले . पाच दिवसांची पोलिस कोठडी आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता , सहाय्यक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी बनावट दस्ताऐवज तयार करणार्याला अटक करयाची आहे . सदर प्रकरणात या आरोपी सोबत कोण व्यक्ती आहे त्यांचा तपास घ्यायचा आहे आणि अशाप्रकारे किती गुन्हे संबंधिताने केले या संबंधीची ही माहिती घेण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली . आरोपीचा गुन्हा करण्यामागे काय हेतु होता याचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
વલસાડમાં ધારાસભ્ય અને પોલીસ વચ્ચે બબાલ #valsad
વલસાડમાં ધારાસભ્ય અને પોલીસ વચ્ચે બબાલ #valsad
સંદેશ વિશેષ : કિંગ ઓફ બ્રિટન
સંદેશ વિશેષ : કિંગ ઓફ બ્રિટન - 9.30 PM -10-09-2022 @Sandesh News
চেপন গাঁও পঞ্চায়তত হৰ ঘৰতিৰংগা কাৰ্য্যসুচীৰ ৱাৰ্ডে ৱাৰ্ডে ৱাৰ্ড-সভা
চেপন গাঁও পঞ্চায়তত হৰ_ঘৰ_তিৰংগা কাৰ্য্যসুচীৰ ৱাৰ্ডে ৱাৰ্ডে ৱাৰ্ড সভা
#AzadiKaAmritMahotsav ৰ...
जमीन की लड़ाई में दहल गया यूपी, परिवार में बस 8 साल का बेटा बचा! | Deoria News
जमीन की लड़ाई में दहल गया यूपी, परिवार में बस 8 साल का बेटा बचा! | Deoria News