यवतमाळ : वणी येथील पत्रकार आसिफ शेख यांच्या घरी चोरट्याने प्रवेश करीत लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला चढविला. यात गंभीर जखमी झालेल्या पत्रकारावरील हल्ल्याचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, मारेगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने तीव्र निषेध करीत आरोपीस तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. वणी येथील बातमीदार आसिफ शेख यांचे वणी निवासी मध्यरात्री एका चोरट्याने प्रवेश केला. यात बाहेर निघालेल्या आसिफ शेख यांचेवर चोरट्याने मागावून येत रॉडने हल्ला चढविला. या घटनेत डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचेवर वणी खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान वणी येथील वाढत्या चोरी, घरफोडीने वणी येथील कायदा सुव्यवस्था धोक्यात येत आता जीवघेणा हल्लाही ऐरणीवर आला आहे. परिणामी झालेल्या हल्ला घटनेचा मारेगाव तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. हल्लेखोरास तात्काळ अटक करण्यात यावी ही आर्जव मागणी करीत मारेगाव ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्फत पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम, सचिव कैलास ठेंगणे, कार्याध्यक्ष दीपक डोहणे, जिल्हा उपाध्यक्ष अनंता गोवर्धन, जिल्हा सरचिटणीस सचिन काकडे, तालुका उपाध्यक्ष अमोल कुमरे, सहसचिव सुनील उताणे, संघटक रवी घुमे, पंकज नेहारे, कैलास मेश्राम, कोषाध्यक्ष जयप्रकाश वनकर, सुरज झोटींग, प्रसिद्धी प्रमुख रोहन आदेवार, संतोष बहादूरे, विवेक तोडासे, राजू पिपराडे,सुदर्शन टेकाम, संदीप कोवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
क्या होता है कॉर्निया डैमेज जिसकी वजह से एक्ट्रेस Jasmine Bhasin की जा सकती थी आंखों की रोशनी
युवाओं में आजकल चश्मे से ज्यादा कॉन्टैक्ट लेंस पहनने का शौक है क्योंकि इन्हें पहनने से आंखों की...
Press Release by BJP National General Secretary Shri Tarun Chugh on the Party's Nationwide Campaign "Har Ghar Tiranga"
Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi ji, in the 112th edition of his popular program...
24 घंटों में 50 से ज्यादा बार ओपन होता है फोन में ये ऐप, हर Smartphone यूजर की है बड़ी जरूरत
हर स्मार्टफोन यूजर के फोन में एक ऐसा ऐप मौजूद है जिसे दिनभर में 50 से ज्यादा बार ओपन किया जाता...
Second hand Mobile Market in Guwahati/ 4000 টকাত iPhone
Second hand Mobile Market in Guwahati/ 4000 টকাত iPhone