नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची विषारी औषध घेऊन आत्महत्या...
"पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील दुर्देवी घटना"
पाचोड(विजय चिडे) सततची नापिकीमुळे पिकांनावर झालेला खर्च,तसेच पावसाने पिकांचे झालेले मोठे नुकसान तसेच बँकेकडून घेतलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील (५५)वर्षीय शेतकऱ्याने स्वत:च्या घरात विषारी औषध प्राशसन करून आपली जीवन यात्रा संपवल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी(दि.१४) रोजी मध्यरात्री दीडच्या वाजेच्या सुमारास घडली असून शेख नबी भिक्कन (वय५५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, शेख यांची कोळीबोडखा शिवारात गावालगतच शेत जमीन आहे.त्यांच्याकडे बँक आँफ महाराष्ट्रचे एक लाख चाळीस हजार तर हात ऊसने एक लाख रूपये कर्ज असल्याची चर्चा नातेवाईकांमध्ये होते.यंदा शेतात कपाशी पिक आहे मात्र पावसांने पिकांचे अतोनात मोठे नुकसान झाले,पिकांनावर झालेला खर्च सुद्धा शेतीच्या उत्पन्नातून निघार नसल्याने त्यांच्यावर कर्जाचा मोठा डोंगर वाढतच होता.
ते मागील काही दिवसांपासून सतत चिंताग्रस्त राहत होते.कर्ज वाढत असल्यामुळे शेख नबी यांनी ही टोकाची भूमिका घेऊन शुक्रवारी मध्यरात्री स्वतःच्या घरात विषारी औषध प्रासशन केले ही घटना त्यांच्या मुलाच्या लक्षात आले असता त्यांनी तात्काळ घरातील नातेवाईकास उठवून शेख नबी यांना खाजगी वाहनाव्दारे पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाँ.साबळे,अधिपचारीका निशा खाडे यांनी त्याच्याँवर प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. परंतु,पाहटेच्या दरम्यान शेख नबी यांची प्राणज्योत माळवले आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बीटजमादार किशोर शिंदे,फिरोज बर्डे हे करीत आहे.