कन्नड : शेतकऱ्याला आपल्या पीकाचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही . हे कुठले स्वातंत्र्य आहे . जीसको लुटना है आसान उसका नाम किसान अशी शेतकर्यांची अवस्था झाली असुन शेती व शेतकरी वाचविण्यासाठी दुसऱ्या शेतकरी क्रांती ची गरज असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य कृषीभूषण भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे . ते कळंकी ता . कन्नड येथे दि . १३ रोजी सायंकाळी आयोजित जनजागृती बैठक प्रसंगी बोलत होते . कन्नड येथे दि . १७ आक्टोंबर रोजी मराठवाड्यातील पहिल्या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले असुन त्या बाबद गावोगावी बैठका घेऊण माहिती व निमंत्रण देण्यात येत आहे . याचाच एक भाग म्हणून कळंकी येथे शिवस्मारक येथे शेतकर्यांची बैठक घेण्यात आली . बैठकीत जेष्ठनेते चंद्रकांत देशमुख , जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे , तालुकाध्यक्ष प्रकाश बोरसे यांनी मार्गदर्शन केले . स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलना मुळे गेल्या हंगामात तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना तेवीस कोटी रुपये वाढीव मिळाले . येत्या काळात ही ऊसा बरोबरच ईतर शेतकरी समस्यां बाबद आंदोलने करण्यात येतील . राज्यातील ३६ साखर कारखान्यांचे ऊस दर ऊस परिषदेत ठरविले जातात . यात मराठवाडा मागे होता . त्यामुळे मराठवाड्यातील पहिली ऊस परिषद मा . खा . राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत कन्नड मध्ये आयोजित केली आहे . अधिकाधीक शेतकर्यांनी सहभागी होण्याचे अवाहन या प्रसंगी केले . यावेळी हरिचंद्र थोरात , वसंत थोरात , माधवराव राऊत , उपसरपंच हरिष थोरात , केदारनाथ थोरात , दिनकर दाभाडे , संतोष कदम , प्रभाकर थोरात , अण्णा थोरात , अरुण थोरात , संदिप पडवळ , माधव कदम , बाबासाहेब थोरात आदी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Jagdeep Dhankhar Mimicry: TMC नेता के खिलाफ सत्ता पक्ष का विरोध, 1 घंटे राज्यसभा में खड़े सभी सांसद
Jagdeep Dhankhar Mimicry: TMC नेता के खिलाफ सत्ता पक्ष का विरोध, 1 घंटे राज्यसभा में खड़े सभी सांसद
पन्ना पुलिस द्वारा कानून एवं सुरक्षा व्यवस्था बनाये रखने हेतु विगत रात्रि की गई काबिंग गस्त
*पन्ना पुलिस द्वारा कानून एवं सुरक्षा व्यवस्था बनाये रखने हेतु विगत रात्रि की गई काम्बिंग गश्त*...
સમી ગાય માતાનો મૃતદેહ રઝટપાટ થયાની ઘટના | SatyaNirbhay News Channel
સમી ગાય માતાનો મૃતદેહ રઝટપાટ થયાની ઘટના | SatyaNirbhay News Channel