विलास जोंधळे यांनी मंत्री महोदय दीपक केसरकर यांची भेट घेऊन चर्चा केली
पालम प्रतिनिधी
पालम तालुक्यातील फरकडा येथील गोदावरी नदीवरील दिग्रस बंधाऱ्यांमध्ये फरकडा येथील शेतकऱ्यांची जास्तीची जमीन बॅक वॉटर मध्ये जात आहे व त्यांना कमी क्षेत्राचा मोबदला मिळाला आहे उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा संबंधित शेतकरी अनेक वेळा प्रशासनाला खेटे मारत आहेत पण त्यांना न्याय मिळेना फरकडा येथील वंचित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा मोबदला देण्यात यावा अशी मंत्री महोदय
दीपक केसरकर यांच्या माध्यमातून
मंत्रालयात भेट घेऊन चर्चा करुन त्यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आले व फरकंडा येथील शेतकऱ्यांचा मोबदला वाटपाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशी मागणी मंत्री महोदय दिपक केसरकर यांना विनंतीही केली तीन ते चार वर्षापासून संबंधित प्रशासनाकडे शेतकरी रवेटे मारत आहेत त्यांना मोबदला तात्काळ वाटप करण्याचे संबंधित विभागाकडे आदेश देण्यात यावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष परभणी तथा महाराष्ट्र सुप्रसिद्ध व्याख्याते विलास जोंधळे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली