सोलापूर :- महात्मा बसवेश्वरांचे प्रेरणास्थान, सर्वधर्म समभावाचे प्रतीक, लिंगायत धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या भवानी पेठ कुंभार वेस येथील किरिटेश्वर संस्थान विरक्त मठाचे मठाधिपती वेदांताचार्या, विद्यावाचस्पती लिं. पूज्य श्री मृत्युंजय महाशिवयोगींच्या ३३ व्या पुण्यस्मरनोणोत्सवानिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी कुंभार वेस येथील किरिटेश्वर मठामध्ये सामुदायिक विवाह सोहळा होणार असल्याचे मठाधिपती निरंजनमूर्ती श्रीमनि स्वामीनाथ महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पुण्यत्सोवाच्या निमित्ताने २७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी सहा वाजता धारवाड मुरघामठाचे मठाधिपती डॉ. पूज्य श्रीमनिप्र मल्लिकार्जुन महास्वामी यांचे 'मुळगुंद बाललीला महाशिवयोगी' यांच्या जीवन चरित्रावर प्रवचन होणार आहे. रोज संगीत कार्यक्रमही होणार आहे. या धर्मसोहळ्याबरोबरच विवाह सोहळ्याला डॉ. शिवानंद महास्वामी, डॉ. निरंजनमूर्ती चन्नबसवा महास्वामी, डॉ. शांतलिंग महास्वामी, बसवलिंग महास्वामी, शिवानंद महास्वामी, प्रशांत महास्वामी, डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामी, साईगावचे शिवानंद महास्वामी, वीरंत महास्वामी, मृत्युंजय महास्वामी, शिवलिंग महास्वामी, प्रभुराज महास्वामी, मुरघेद्र महास्वामी, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, सिंधुताई काढादी, माजी नगरसेवक सुरेश पाटील, दावणगिरी येथील तवकारी कुटुंबीय, डॉ. शिवयोगी स्वामी, शिवमुर्ती स्वामी, शिवलीलाम्मा यांच्यासह भाविक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन श्रीमनिप्र स्वामीनाथ महास्वामी यांनी केले आहे.