बीड (प्रतिनिधी) जिल्हा रेशीम कार्यालयात शेतकऱ्याची आर्थिक लूट होत असताना सुद्धा अधिकारी बघायचीच भूमिका घेत आहे चेक साठी पैशाची मागणी होत आहे पैसे दिले तरच चेकची पूर्तता होते ती आर्थिक लूट थांबवावी व ते अधिकारी विरुद्ध कारवाई करण्यात यावी
इतर मागण्यासाठी शेख युनूस चन्हाटाकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की , जिल्हा रेशीम कार्यालय , बीड येथील क्षेत्र सहाय्यक श्री.सोनटक्के हे जिल्हा रेशीम कार्यालयात कार्यरत असून त्यांच्या कडे परळी , अंबाजोगाई , धारूर , वडवणी , गेवराई तालुक्याच्या कार्यभार असून येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडुन काम मंजूर करणे , व मंजुर करणे व पोखरा योजने कामांना ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी कामांसाठी पैशांची मागणी करतात तसेच पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम करत नाहीत ते शेतकन्याची आर्थिक व मानसिक पिळवणूक करत आहे . पोखरा योजनेचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता संबंधितांनी कार्यक्षेत्रावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नाहरकत प्रमाणपत्र देणे अपेक्षित असताना श्री . सोनटक्के कार्यक्षेत्रावर न जाता रेशीम कार्यालयात बसूनच पाच - दहा हजार रुपयांनी मागणी करून प्रमाणपत्र तयार करुन देतात . जिल्हयातील रेशीम शेतकऱ्यांचे कुशल बिले रेशीम कार्यालयातुन चेक व्दारे वाटप केली जातात सदरील चेक वाटप करतात देखील 500 / - रुपये घेतल्याशिवाय श्री . सोनटक्के हे चेक वाटप करत नाहीत . सदरील बाब माहीत असुन देखील जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री . पवार साहेब हे सोनटक्के यांना पाठीशी घालुन जानीव पुर्वक सहा ते सात तालुक्याचा कार्यभार देऊन श्री . सोनटक्के यांच्यामार्फत श्री . पवार हे जिल्हयात मोठ्या प्रमाणात रेशीम शेतकन्याची आर्थिक लुट होत असल्याची चर्चा रेशीम शेतकऱ्यात होत आहे . जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी की , जिल्हा रेशीम कार्यालयाकडून शेतकन्याची होणारी आर्थिक • पिळवणूक थांबण्यासाठी सदरील प्रकरणात आपण स्वतः लक्ष देऊन . सोनटक्के यांच्या सर्व कार्यभर काढून घ्यावा व त्यांना निलंबित करावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले एईल असा इशारा निवेदन द्वारे शेख युनूस चन्हाटाकर यांनी केला आहे.