रत्नागिरी : क्रेडिट कार्ड क्लोज करण्याच्या बहाण्याने महिलेची 31 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 3 जून 2022 रोजी दुपारी 2.30 वा. कोकणनगर येथे घडली होती.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
शर्मा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात प्राजक्ता दिलीप राठोड (35,रा.कोकणनगर, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, 3 जून 2022 रोजी दुपारी प्राजक्ता राठोड यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. बोलणाऱ्याने आपले नाव शर्मा सांगून राठोड यांना तुमचे क्रेडिट कार्ड क्लोज करतो असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन राठोड यांनी आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर शर्माला दिला. काही वेळाने राठोड यांच्या बँक खात्यातून 30 हजार 900 रुपये ऑनलाईन पद्धतीने काडून त्यांची फसवणूक करण्यात आली. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.