उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुर तालूक्यातील किलज येथील शेतकरी दत्ता कोंडीबा कोळेकर यांच्या एका दुभत्या म्हशीचा वीज पडून दि.१२ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास मृत्यू झाला आहे.
तुळजापुर तालुक्यात काल सायंकाळी परतीच्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणीचं पाणी केले आहे.या परतीच्या पावसात विज पडून किलज येथील शेतकरी दत्ता कोळेकर यांच्या म्हशीचा मृत्यू झाला आहे.यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.सदर घटनेचा प्रत्यक्ष पंचनामा आज दि.१३ ऑक्टोबर रोजी किलज सज्जा चे तलाठी आप्पासाहेब माने यांच्या समवेत पशुधन पर्यवेक्षक डॉ वागतकर यांनी केला आहे.या घटनेचा करण्यात आला असून पंचनाम्यानुसार ७० हजारांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे.पंचनामा दरम्यान नुकसानग्रस्त शेतकरी दत्ता कोळेकर,इंद्रजित कोळेकर,राजेंद्र कुठार, शिवाजी मोजगे, यांच्या सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.सदर शेतकरी हा अंत्यत गरीब असून झालेल्या घटने मुळे तो हतबल झाला असून शासनाकडून झालेल्या नुकसानीबाबत नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.