चिपळूण : अखिल रत्नागिरी जिल्हा कोष्टी समाज संघटनेतर्फे दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील कोष्टी समाज भवन येथे ज्ञातीतील गुणवत विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहोळा आयोजित केला आहे. संघटनेचे अध्यक्ष गजानन लोकरे व कोकण विभागीय कोष्टी समाजाचे अध्यक्ष प्रवीण दिवटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये ८० टक्के, बारावीमध्ये ७० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत, पदवी, पदव्युत्तर पदविका तसेच मेडिकल, इंजिनियरमध्ये प्रथम वर्ग, तसेच पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळविले आहे. त्या विद्यार्थ्यांनी आपले नाव व पूर्ण पत्ता, फोन, मोबाईल नंबर, गुणपत्रक प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटोसह आपले अर्ज वरील पत्त्यावर पावावेत व आपली नावे संघटनेचे अध्यक्ष गजानन लोकरे मो. ९४२१९००१७२, सेक्रेटरी अरविंद भंडारी मो. ९३५६९८६४१९, प्रमोद नेटके, रमाकांत उकार्डे, दीपक रंगाटे, चंद्रकात रेपाळ, विजय दुधाणे यांच्याकडे नोंदवावीत. तसेच समाज बांधवानी या गुणगौरव सोहोळ्याला मोठ्या संख्यने उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.