कन्नड तालुक्यातील पाणपोई परिसरातील बहिरगाव रोडवर गौण खनिज मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या आदिवासी भिल्ल समाजाच्या शाळकरी मुलीचा बळी गेल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी घडली होती , याप्रकरणी घटनास्थळी दिवसाढवळ्या गौण खनिजाचे अवैध उत्तखनन आणि वाहतूक करणाऱ्या जेसीबीच्या व ट्रॅक्टरच्या चालकांसह मनुष्यवधाचा आणि गौण खनिज तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात यावा , अशी मागणी गौतम रामचंद्र शिरसाठ यांनी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांच्याकडे मंगळवारी निवेदनाद्वारे मालकांवर केली आहे . मुरुमाच्या जास्तीत जास्त खेपा मारण्याच्या स्पर्धेत आदिवासी भिल्ल समाजाच्या शाळकरी मुलीचा नाहक बळी गेला . या प्रकरणात खुलेआम होणाऱ्या गौण खनिज तस्करीकडे पाहून न पाहिल्यासारखे करणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकारी , कर्मचारी यांची चौकशी करावी आणि शाळकरी मुलीच्या मृत्यूस कारणीभूत जेसीबी - ट्रॅक्टर चालक - मालकांवर मनुष्यवधाचा आणि गौण खनिज तस्करीचा गुन्हा दाखल करावा , अशी मागणी केली . निवेदनावर छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण गायके , अंबादास मोरे , रामदास सोनवणे , एकनाथ गायकवाड , रामनाथ काळे , संतोष सोनवणे व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत