संगमेश्वर : कोकण रेल्वेच्या संगमेश्वर स्थानकाची दुरवस्था झाली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

 जुलै महिन्यात कोकण रेल्वे प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी संगमेश्वर रोड स्थानक फलाट क्र. दोन ची पाहणी करून केली. या फलाटावर अनेक ठिकाणी खचलेला फलाट, तुटलेली फलाटाची कडा अवस्था त्यांच्या निदर्शनास आणून दिले, त्यांनी दुरुस्तीचे आश्वासन दिले. परंतु तीन महिने झाल्यानंतर या फलाटाची दुरूस्ती झालेली नाही. या कामाकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. दिलेल्या आश्वासनाचे काय? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. संगमेश्वर वासियांचे काहीही ऐकायचे नाही असेच कोकण रेल्वेने ठरविले आहे काय? दिवा सावंतवाडी पैसेंजर, मुंबई मडगाव मांडवी तुतारी एक्सप्रेस या गाड्या फलाट क्रमांक दोनवर येऊन थांबत असतात. स्वतःच्या सामानासह फलाट क्रमांक दोन वर प्रवाश्याची लगबग सुरु असते. यातच एखादा अपघात झाला. तर कोकण रेल्वे जबाबदारी घेणार का? असा प्रश्न संदेश जिमन यांनी उपस्थित केला आहे. या कारणासाठी सुद्धा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागणार का? असा सवाल निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य ग्रुप चे प्रमुख संदेश जिमन यांनी विचारला आहे.