सुमारे १ कोटी कर्जाची परतफेड करूनही खासगी सावकारांचा जाच कमी होत नाही म्हणून त्रासाला कंटाळून औरंगाबादेतील बिल्डर नंदकिशोर रामराव नांदेडकर ( ४ ९ ) ९ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाले आहेत . त्यांनी यासंबंधी एक चिठ्ठीही लिहून ठेवली आहे . पूर्वी शिवाजीनगर , नक्षत्रवाडी भागात राहणारे नांदेडकर काही महिन्यांपासून साताऱ्यातील विजयंतनगरमध्ये वास्तव्यास होते . अनेक वर्षे त्यांनी इलेक्ट्रिक ठेकेदार म्हणून आणि २०१८ पासून बांधकाम व्यवसाय सुरू केला होता . व्यवसायासाठी त्यांनी काही खासगी सावकारांकडून व्याजावर पैसे घेतले होते . ९ ऑक्टोबरला नांदेडकर घराबाहेर पडले ते अजून परतले नाहीत . कुटुंबीयांनी नातेवाईक , मंदिरे , रेल्वेस्थानक , मूळ गावी शोध घेतला . पण पत्ता लागला नाही . लाइक मोबाइल घरीच , चिठ्ठीत ६ ते ७ जणांचा उल्लेख मोबाइल घरीच ठेवून नांदेडकर यांनी घर सोडले होते . चिठ्ठीत सहा ते सात जणांकडून सुमारे १ कोटी रुपये घेतल्याचा उल्लेख आहे . अद्याप गुन्हा दाखल नसल्याने पोलिसांनी सावकारांची नावे जाहीर केली नाहीत .