रत्नागिरी : शुक्रवार 14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार १, रत्नागिरी येथे राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

तरी संबधितांनी बैठकीत उपस्थितीत रहावे असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती रत्नागिरी एम. देवेंदर सिंह यांनी कळविले आहे.