चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावर सावर्डे पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या आगवे येथे मारुती अल्टो कार आणि टू व्हीलर यांच्यात अपघात झाला होता. अपघातानंतर कार 60 ते 70 फूट खोलदरीत नाल्यामध्ये कोसळली होती. या अपघातात अल्टो कार मधील दोन जण जखमी आहेत. यामध्ये रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथील मानसोपचार तज्ञ डॉ. समीक्षा जाधव पोळ या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू असताना आज सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. त्यांच्या मृत्यूने रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथील डॉक्टरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

 29 सप्टेंबर रोजी डॉ. समीक्षा जाधव या आपल्या पतीसह चिपळूण येथे एका कॅम्प साठी जात होत्या. यावेळी त्यांच्या गाडीला समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक बसली. अपघातानंतर डॉक्टरांची गाडी खोल दरीत कोसळली. यामध्ये डॉ. समीक्षा जाधव पोळ या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापती झाल्या होत्या. त्यांना सावर्डे पोलिसांनी डेरवण येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर डेरवण येथे तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्या उपचाराला साथ देत नसल्यामुळे त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले होते. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू होते. मात्र 12 सप्टेंबर रोजी 12 दिवसांची त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज सायंकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

त्यांच्या मृत्यूची बातमी रत्नागिरी येथे समजताच डॉक्टर, नर्स, आशा सर्वांनी हळहळ व्यक्त केली. मनमिळावू स्वभावाच्या आणि सर्वांना आपलस करणाऱ्या डॉक्टर आज आपल्यातून गेल्याच दुःख त्यांनी व्यक्त केलं. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे स्टेटसही ठेवले आहेत.