सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे समृद्धी हॉस्पिटल व अर्धांगूवायू उपचार संशोधन केंद्र संस्था संचलित,अर्जुनदास महाराज वृद्धाश्रमात उदसी मठ अर्जुनदासनगर यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेच्या ऊत्सवानिमित्त मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचा अंधारी परिसरातील जवळपास ३०० नागरिकांना लाभ घेतला.या शीबीरामध्ये,नागरिकांचे डोके दुखणे,हातपाय गळणे,सतत ताप येणे,सारखी – सारखी सर्दी होणे,दमा लागणे,हाडे दुखणे,आदी बाबीवर मोफत उपचार देण्यात आले.
यावेळी उदासी मठाचे पिठाधीश अनिलदास महाराज, शिष्य परमेश्वर महाराज,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे,सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण तायडे,समृद्धी हॉस्पिटलचे डॉ.सागर मुळे,ग्रा.प.सदस्य अनिल गोरे, अंकुश तायडे,डॉ.भाग्यश्री मुळे, मनोज मुळे, विकास गोरे,वाहेद शेख,निलेश उबाळे,अर्जुन ढेपले,धनंजय खराते,प्रीतम तोडकर,सतीश जाधव,निकिता उबाळे,प्रदीप घडमोडे,बाळासाहेब वाघमारे,गणेश वाडेकर, कल्पना मोरे,सविता थोरात,प्रज्ञा कांबळे,भावेश तायडे,आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.