जिंतूर /प्रतिनीधी
येथील नवीन शालेय व्यवस्थापन समितीचा पुनर्गठन कार्यक्रम
आज दिनांक 10/10/2022 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शाखा क्रमांक. (01) उर्दू शाळेत संपन्न झाला बैठकीत सर्व सदस्यांनी सर्वानुमते बिनविरोध अध्यक्ष म्हणून सिराज सिद्दिकी यांची निवड केली
सन 2022-2024 या दोन वर्षा साठी नवीन शालेय व्यवस्थापन समिती ची स्थापना करण्यात आली. या वेळी इयत्ता 1 ते 8 च्या पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक वर्गातून विद्यार्थी संख्या प्रमाणे, सामाजिक आरक्षण नुसार व महिला आरक्षण 50% प्रमाणे शालेय सदस्यांची / प्रतिनिधींची निवड खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून सिराज सिद्दीकी तर उपाध्यक्ष म्हणुन सय्यद मकसूद अली यांची निवड करण्यात आली. तसेच अमरीन बेगम वाजीद खान यांची शिक्षण तज्ञ म्हणून निवड करण्यात आली. मो. शहबाज सर यांची शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्राचे केंद्र प्रमुख मा.एम डी घुगे होते या वेळी शालेय व्यवस्थापन समिती चे सदस्य व पालक उपस्थित होते.
सर्व निर्वाचित सदस्यांना एम. डी. घुगे यांनी मार्गदर्शन केले व समिती चे नियम, अधिकार, जबाबदारी आणि कर्तव्य इ. बाबी समजुन सांगितले, शाळेची प्रगती, दर्जा व भौतिक सुविधा आणि शाळेतील अडीअडचणी दूर करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करावे, तसेच विध्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. सचिव श्री.शेख अब्दुल मजीद मोईनोद्दीन यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचे हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले प्रास्ताविक अब्दुल मजीद सर यांनी केले तर आभार मोहम्मद शहबाज सर यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सय्यद रियाजोद्दीन सर यांनी केले. या वेळी शाळेतील सर्व महिला शिक्षकांनी समिती स्थापनेसाठी परिश्रम घेतले.