हडपसर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वररंग २०२२ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वात जास्त पारितोषिके मिळविणारे कॉलेज म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, एस.एम. जोशी कॉलेजला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत पुणे शहरातील ३६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यात रयत शिक्षण संस्थेचे, नामांकित एस. एम. जोशी कॉलेजमधील ६९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांमध्ये पारितोषिके मिळवून कॉलेजचे नाव उंच करण्याचा प्रयत्न केला आहे. संगीत स्पर्धेमधील प्रथम पारितोषिक लोक वाद्यवृंद सोलो महावीर रणदिवे (FYBA), द्वितीय पारितोषिक वेस्टर्न गाणे शिवानी वाघ (FYBSc) यांना मिळाले. नृत्य स्पर्धेमधील प्रथम पारितोषिक लोकसामुहिक नृत्यास मिळाले. नाट्य स्पर्धेमधील प्रथम पारितोषिक एकांकिकेस, द्वितीय पारितोषिक मुकाभिनयास, प्रथम पारितोषिक मिमिक्रीस, प्रथम पारितोषिक स्किट या प्रकारास मिळाले. ललित कला स्पर्धेमधील द्वितीय पारितोषिक रांगोळी, द्वितीय पारितोषिक कोलाज व द्वितीय पारितोषिक फोटोग्राफी या प्रकारास मिळाले. या स्पर्धेसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून प्रेरणा व प्रोत्साहन दिले. विद्यार्थी हा केंद्रबिंदू लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगांनी फुलावे. बहरावे.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडावेत.यासाठी सतत प्रेरणा देणारे त्यांचे विचार सर्वांनाच प्रोत्साहित करणारे आहेत. त्यामुळे विद्यार्थी हे यश मिळवू शकले. विद्यार्थ्यांच्या या यशात सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शिल्पा शितोळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अतुल चौरे, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. किशोर काकडे, डॉ.नम्रता मेस्त्री, डॉ. विश्वास देशमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, सर्व स्पर्धांचे चेअरमन व स्पर्धा प्रमुख, ज्युनियर विभागप्रमुख प्रा . तृप्ती हंबीर या सर्वांचे योगदान आहे. त्याचबरोबर साधना संकुलातील कलाशिक्षक कारभारी देवकर आणि भानुदास पाटोळे यांचेही सहकार्य लाभले.या स्पर्धेत यश मिळावे यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड यांनी कर्मवीर जयंतीचे औचित्य साधून युवा महोत्सवात ज्या स्पर्धा घेतल्या जातात , तशाच सर्व स्पर्धा कर्मवीर सप्ताहाच्या रूपाने आयोजित कराव्यात. ही भूमिका प्रथमच घेण्यात आली. या अभिनव प्रयोगाला उदंड असा प्रतिसाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मिळाला. त्यामुळेच एस. एम .जोशी महाविद्यालय सर्वाधिक पारितोषिके मिळवणारे महाविद्यालय ठरले . महाविद्यालयाला घवघवीत यश मिळाल्यामुळे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પેટલાદ પંથકમાં દિવસ દરમિયાન ધોધમાર વરસાદ
પેટલાદ પંથકમાં આજે બપોરના સમયે વાદળો ચડી આવ્યા હતા અને વીજળીના ચમકારા અને ગાજવીજ સાથે...
મહુવા 99 વિધાનસભા આપ ના ઉમેદવાર અશોકભાઈ જોળિયા એ પોતાના સમર્થકો સાથે ઉમેદવારી નોંધાવી
મહુવા 99 વિધાનસભા આપ ના ઉમેદવાર અશોકભાઈ જોળિયા એ પોતાના સમર્થકો સાથે ઉમેદવારી નોંધાવી
IPL 2023: 'क्रिकेट आपको तगड़ा थप्पड़ मारेगा', आखिर Shubman Gill पर क्यों भड़क गए Virender Sehwag?
नई दिल्ली, स्पोर्ट्स डेस्क। शुभमन गिल गुरुवार को पंजाब किंग्स के खिलाफ...
বাহাৰঘাট অঞ্চলত আকৌ প্ৰচণ্ড শিলাবৃষ্টি
এবাৰ এবাৰকৈ দুবাৰে শিলাবৃষ্টি হয় কামৰূপ আৰু নলবাৰী জিলা সীমান্তবৰ্তী ঠাই বাহাৰঘাট অঞ্চলত৷উল্লেখ্য...
કેન્દ્રમાં નરેન્દ્ર મોદી સરકારના 11 વર્ષ પૂર્ણ થતા પ્રદર્શની અને પ્રેસમીટ નું આયોજન કરવામાં આવ્યું
કેન્દ્રમાં નરેન્દ્ર મોદી સરકારના 11 વર્ષ પૂર્ણ થતા સંકલ્પથી સિધ્ધિના ૧૧ વર્ષ પૂર્ણ થતા કેન્દ્રની...