संगमेश्वर : जिल्हा शासकीय रुग्णालय तर्फे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी विद्यार्थांना तंबाखू मुक्तीसाठी विषय देण्यात आला होता. तसेच चित्रकला स्पर्धा ही घेण्यात आली.
या स्पर्धेत खाडी पट्ट्यात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंड्ये नंबर 2 च्या प्रथमेश प्रदीप दसम या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक आकाश अनिल दसम याने पटकावला. यशस्वी विद्यार्थांना जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी गौरवलं. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार, जिल्हा शल्य चिकीत्सक संघमित्रा फुले आदी उपस्थित होते.