उरण शहरातील बाजारपेठेत तरुणावर हल्ला...

शहरातील चारफाटानजीक मोटारसायकलवर आलेल्या तरुणाने केला हल्ला... 

उरणमध्ये २२ वर्षीय तरुणाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार , जखमी तरुणाला नवीमुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल... 

संशयीत आरोपी तरुणाला पोलीसांनी ताब्यात घेतले... 

क्षुल्लक कारणावरून हल्ला केल्याची शक्यता, जखमी तरुण गंभीर जखमी...

रायगड जिल्ह्यातील उरण शहरातील बाजारपेठेत मोटारसायकलवर आलेल्या तरुणाने २२ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. तर, जखमी तरुणाला नवीमुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

रविवारी रात्रीच्या सुमारास उरण शहरातील चारफाटानजीक मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात तरुणाने २२ वर्षीय ताह गुलजार शेख या तरुणावर धारदार शस्त्राने अचानक हल्ला केला. यावेळेस, जखमी ताह शेख यांच्या मानेवर वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यावेळी जखमी तरुणास रुग्णालयात नेण्यात आले. तर, रुपेश लल्लन प्रसाद (22) या आरोपी तरुणाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून, यातील एक आरोपी फरार झाला आहे. यानंतर जखमी तरुणाला नवीमुंबईतील एमजीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, आरोपी  ततरुणाची पोलीसांकडून चौकशी करण्यात येत असून किरकोळ वादातून हल्ला केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.