जिंतूर तालुक्यातील गणपूर येथे सरनावर पेट्रोल टाकताना भडका झाला असता ग्रामस्थ राधाजी मारोतरावं वजीर यांच्या शर्ट ने पेट घेतला आणि इजा झाली.......... थोडक्यात हकीगत अशी की गणपूर येथे प्रयागबाई प्रसादराव वजीर यांचे निधन झाले. अंत्यविधी करताना सारण रचल्यानंतर मुलगा रामेश्वर प्रसादराव वजीर यांनी अग्नी दिला. परंपरेनुसार विधी पार पडला परंतु पावसाचा अंदाज पाहून विधी लवकर उरकण्याच्या घाईत बाटलीतील पेट्रोल टाकण्यात आले यावेळी पेट्रोलच्या भडक्याचा गोळा टाकणारे राधाजी मारोतरावं वजीर यांच्या पाठीवर पडला. शर्ट ने पेट घेतला मात्र राधाजीने समय सूचकता बाळगून बाजूच्या शेतात जाऊन ओल्या जमिनीवर गडबडा लोळले व आग विझाली. त्यांना पाठीवर व तोंडाला इजा झाली त्यामुळे एकच धावपळ झाली. आग विझवण्यासाठी पालिस पाटील पंढरीनाथ वजीर, मुंजाजी वजीर, विश्वनाथ वजीर, नारायण वजीर, माधव वजीर यांचेसह ग्रामस्तानी मदत केली. राधाजी यांना तात्काळ बोरी येथे जनार्धन वजीर यांनी दवाखान्यात नेले व उपचार करण्यात आले. अंतविधीस अनंतरावं कोरडे, प्रा. प्रभाकर वजीर, बादाड,झाडें, प्रा. रामभाऊ गणपूरकर, कास्टये, नातेवाईक, ग्रामस्थ उपस्थित होते.