रत्नागिरी : उद्योग मंत्री नामदार तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांचे सहकार्याने तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय तथा जिल्हा आरोग्य विभाग रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमानाने ,महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे दिनांक 7 ते 9 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते.

अवकाळी पावसामुळे शिबिराच्या आयोजनावर प्रश्न निर्माण झाला होता. माळनाका येथील व्यायामशाळेच्या मोकळ्या मैदानात हे शिबीर होणार होते. परंतु पावसामुळे जागेचा प्रश्न निर्माण झाला होता, शिबीर तर ठरल्याप्रमाणे घ्यायचेच होते. प्रसिद्धी पण झाली होती . पावसाचं संकट सुरू झालं होतं अशा या संकटात गांधी पेट्रोल पंपचे मालक जयुशेठ गांधी मदतीला आले. त्यांनी मोकळ्या मनाने कोणतेही आढेवेढे न घेता त्याच्या शोरूमची जागा शिबिराला दिली. ती पण उदय सामंत घेत असलेल्या एका चांगल्या समाजकार्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल हे सांगून !

सलग 3 दिवस सुरू असलेल्याया शिबिराची सांगता 3 दिवसात 856 महिलांच्या सहभागाने झाली.

या 3 दिवसाच्या शिबिराच्या यशामध्ये आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी – डॉ. अनुराग बेडेकर (जनरल सर्जन), डॉ. जीवन पाटील (DR. ORTHO M.O.), डॉ. जीज्ञा लाखाटे (DE IC M.O.), डॉ. रूबीना खान, डॉ. हीना काझी,डॉ आदीती परब, अभिलाषा देशमुख, समुपदेशक – प्राची भोसले, प्राजक्ता जाधव, रामेश्वर म्हेत्रे, फार्मासिस्ट- संतोष शेलार,अक्षय सागवेकर,नमिरा रखानगी, अल्ताफ कुडचे Lab Scientific Officer – प्रज्ञा कामतेकर, राधा हेळेकर, अलिशा भोळे, मेडीकल स्टोअर – अनिल म्हस्के, आरोग्यसेवक- विश्वानंद विजय साळवी (बापू साळवी) , सागर पाटील, अनिल धोपटे,आरोग्यसेविका प्रियांका रावणंग,भाग्यश्री ठीक,रुपाली पोळेकर, ए डी पालशेतकर, एम जी हांडे, HLL Phlebo- प्रतिमा पवार,मयुरी वाडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या शिबिरासाठी स्मितल पावसकर यांचे मार्गदर्शनाखाली शिल्पा सुर्वे, कांचन नागवेकर, दिशा साळवी, कौसल्या शेट्ये, दया चवंडे, श्रद्धा हळदणकर, पूजा पवार, ऋतुजा देसाई, प्रिया साळवी, आरती तळेकर, योगिता खांडेकर, रुपाली नागवेकर, समीक्षा वालम, अनिशा डोंगरे, अंकिता मोहिते, सुहासिनी भोळे, सायली विकास पाटील, मानसी साळुंखे, सुचिता वाईकर , चेतना गाडेकर, अर्चना शिंदे, वैभवी शिंदे या महिलांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी खूप मेहनत घेतली.