पालम प्रतिनिधी

पालम तालुक्यातील फरकंडा - जि. प. कै. प्रा. शा. फरकंडा व आगनवाडी येथे आज दिनांक 10.10. 2022 रोजी शाळेचे मु. अ. श्री मस्के सर व आरोग्य कर्मचारी श्री डांगे यांच्या हस्ते1 ते 19 वर्षे वयोगटातील मुला मुलींना जंतनाशक गोळ्याचे वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वाटप करण्यात आले.

यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, आरोग्य कर्मचारी, (अंगणवाडी - मदतनीस) अंगणवाडी सेविका व अशा यांनी सहकार्य केले.