कन्नड तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी शेतातील मका व सोयाबीनची कापणी केली होती . पिके शेतातच असताने परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने , मक्याची खुडलेली कणसे , कापून आडवा झालेला सोयाबीन भिजला आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे . मका व सोयाबीन पाण्यात भिजल्याने त्यावर अंकुर फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे . अगोदरच उडीद , मूग व बाजरीचे पिक हातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला होते . आता शेकडो हेक्टरवर मका व सोयाबीनलादेखील पावसाचा फटका बसला आहे . गेल्यावर्षी कापसाला १० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने कापसाची लागवड केली होती . मात्र सुरवातीला एक महिना पावसाने दडी मारल्यानंतर , सप्टेंबरमध्ये पुनरागमन केले . अतिवृष्टीचा मार बसल्याने कैऱ्या परीपक्व होण्याच्या काळातच , लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला . त्यातच पावसामुळे वेचणीवर आलेला कापूसही भिजला आहे . भरपाईची मागणी होत आहे . मजुरांची होतेय चांदी शेतकऱ्यांनी महागडे बियाणे , खते देऊन , मशागतीवर खर्च करून पिके जगवली आहेत . आता काढणीवरील पिकांचे डोळ्यासमोर नुकसान होताना पाहून शेतकरी दु : ख व्यक्त करत आहेत . कापूस वेचणीसाठी प्रतिकिलो दहा रुपये , किंवा अर्ध्या दिवसाला दोनशे रुपये मजुरी लागते . शहरी मजूर आणण्यासाठी प्रत्येक मजूरास २० रुपये शिक्षा भाडे द्यावे लागते