रत्नागिरी : शहरातील काही रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. रत्नागिरी बोर्डिंग रोड ( फणसी ) येथील अजिजा दाऊद नाईक ( आयडियल ) हायस्कूल रत्नागिरी यांच्या मुख्य गेट समोरील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले होते. ते खड्डे बुजविण्या करिता नगर परिषदेकडे व तेथील वॉर्ड नगर सेवकांकडे सतत संपर्क साधून खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. तरीही खड्डे भरले गेले नाहीत. तसेच त्या खड्ड्यामध्ये गटाराचे घाण पाणी साचून राहत होते. त्या पाण्यातून वाहने गेली असता शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कपड्यावर घाण पाणी उडून कपडे खराब होत होते. 

दरम्यान विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन अजिजा दाऊद नाईक हायस्कूल येथे विद्यार्थी घेऊन येणारे व्हॅन, स्कुल बस व रिक्षा चालक मालक यांनी श्रमदान करून खड्डे बुजवले. तसेच रिक्षा चालक संघटना अध्यक्ष -शब्बीर भाटकर, युसूफ मजगांवकर, मुख्तार सोलकर, वसीम म्हस्कर, अल्लिसाब मस्तान, इमाद, अरबाज मोगल, फरहान व इतर सभासद यांनी परिश्रम घेऊन खड्डे बुजविले.