रत्नागिरी मध्ये ईद-ए-मिलाद रॅली उत्साहात

रत्नागिरी : तालुक्यात ईद-ए-मिलाद साठी रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यामध्ये लहानापासून मोठयांपर्यंत सर्वांनी उत्साह दाखवला. ही रॅली कोकण नगर ते मारुती मंदिर उद्यम नगर त्यानंतर पुन्हा कोकण नगर येथे नेण्यात आली. या रॅलीमध्ये चार चाकी वाहने, रिक्षा, व मोटरसायकल मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. ही रॅलीत दावते इस्लामी जिल्हाध्यक्ष अल्ताफ कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.