संभाजी ब्रिगेडचे अर्धनग्न आंदोलन; छत्रपती संभाजी महाराज तलावाचे काम युद्धपातळीवर सुरू करा. 

सोलापूर :- विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी तलाव संवर्धनासाठी केंद्राकडून भरघोस निधी येऊन सुद्धा गेल्या पाच वर्षापासून महानगरपालिकेच्या ढीम कारभारामुळे संवर्धनाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने तलावामध्ये उतरून अर्ध नग्न आंदोलन करून महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. 

गेल्या पाच सहा वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण्यासाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने पाठपुरावा सुरू आहे खासदार शरद बनसोडे व आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नाने केंद्राकडून भरघोस निधी महानगरपालिकेला प्राप्त होऊन सुद्धा महानगरपालिकेच्या ढिम्म कारभारामुळे सुशोभीकरणाचे काम अर्धवट आहे गेल्या पाच वर्षात फक्त फुटपाथ करणे दिव्याची सोय करणे व जलपर्णी तसेच गाळ काढणे गणपती विसर्जन कुंड तयार करणे एवढेच काम झालेले आहे एवढा भरघोस निधी येऊन सुद्धा सुशुभीकरणाचे म्हणावे तसे काम झालेले नाही एव्हढा निधी कुठे खर्च केला याची चौकशी करण्यात यावी लोकप्रतिनिधींचा महानगरपालिका अधिकाऱ्यावर कसलाच वचक असल्याच दिसून येत नाही

छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे सिद्धेश्वर तलावाच्या धरतीवर लेझर शो आणि साऊंड सिस्टिम बसविण्यात यावे. सर्व परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे

तलाव परिसरात होणाऱ्या अनैतिक प्रकारावर आळा घालावा नागरी वसाहत वसाहती मधून येणारे ड्रेनेजचे घाण पाणी तलावात मिसळत आहे यावर उपाययोजना त्वरित करावी संभाजी महाराज तलाव हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावा अशा मागण्या संभाजी ब्रिगेडचे वतीने करण्यात आल्या 

यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, अरविंद शेळके, महेश तेल्लुर, नागेश पवार, दत्ता जाधव, रमेश चव्हाण, सिताराम बाबर, सागर राठोड, राहुल सावंत, शाहू लामकाने, महेश भंडारे, मुस्तफा शेख, प्रतीक बाली, अजय कांबळे, आर्यन कांबळे संजय भोसले ईत्यादी उपस्थित होते.