पैठण : तालुक्यातील कृष्णापुरवाडी येथे दि.8ऑक्टोबर 2022 रोजी राजपूत प्रिमियर लिग 3 चे क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक विजेते केकेआर कासनापुर  संघ ठरले आहे.सामाजिक कार्यकर्ता तथा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी गजानंद बोहरा यांच्या हस्ते 1ऑक्टोबर रोजी उदघाटन झालेल्या क्रिकेट टुर्नामेंटचा अंतिम सामना खेळण्यात आला.यावेळी प्रथम ट्रॉफी पारितोषिक विजेता संघ केकेआर कासनापुर ठरला आहे.या संघाचे मार्गदर्शक गोपाळ बहुरे व कँप्टन राहुल जोनवाल होते. या संघाला प्रथम पारितोषिक 21हजार रुपये व ट्रॉफी भाजपा तालुका पदाधिकारी गजानंद बोहरा यांच्या हस्ते देण्यात आले.तसेच द्वितीय पारितोषिक विजेता संघ समृद्धी एक्सप्रेस शिवगाव यि संघाचे मार्गदर्शक व कँप्टन शांतीलाल राजपूत होते.या संघाला द्वितीय पारितोषिक 11हजार रुपये व ट्रॉफी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पी आय संदिप राजपूत यांच्या हस्ते देण्यात आले.तिसरे पारितोषिक गोकुळवाडी व भिलदरी या संघामध्ये राजपूत भामटा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवराज बहुरे यांच्या हस्ते देण्यात आले.तसेच मँन ऑफ दि सिरीज राहुल जोनवाल यांना दारासिंग जारवाल यांच्या हस्ते तर बेस्ट बँटसमन अवार्ड रघु सरकार यांच्या हस्ते देण्यात आले.बेस्ट बॉलरचे पारितोषिक किशोर कवाळे यांना गजानन महेर यांच्या हस्ते देण्यात आले.ट्रॉफी आयोजक कमलसिंग सुंदर्डे यांनी अतिशय चांगल्याप्रकारे क्रिकेट स्पर्धा भरवल्या त्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते गजानंद बोहरा यांनी त्यांचे कौतुक केले.आणि जे खेळाडू चांगले खेळतात त्यांना पुढे जाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता गजानंद बोहरा यांच्याकडून मदत करण्यात येईल असे यावेळी सांगितले.तसेच पंच राठोड यांनी चांगली अंम्पायरिंग केल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले.या क्रिकेट स्पर्धेत 288 खेळाडुंनी सहभाग घेतला होता.एकुण 16संघ खेळले.यावेळी आयोजक कमलसिंग सुंदर्डे,संदिप राजपूत, युवराज बहुरे,राहुल राजपूत,रघु सरकार, जीवन,राहुल बहुरे,चत्तर जारवाल,राहुल जोनवाल,सुनील गुसिंगे या कमिटीने चांगले काम पाहिले.त्याकरिता सामाजिक कार्यकर्ते गजानंद बोहरा यांनी आयोजक, कमिटी व सर्वच खेळाडुंचे अभिनंदन केले.या क्रिकेट स्पर्धेसाठी डिवाय एसपी भरत महेर यांचेही योगदान लाभले.या क्रिकेट स्पर्धेत असंख्य क्रिकेट खेळाडू प्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.