पाथरी(प्रतिनिधी) ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीच्या संदर्भात आज ०८ ऑक्टोबर रोजी दुपारी ०२:०० वाजता पाथरी पोलीस स्टेशन येथे अहले सुन्नत वल जमातच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करून शांतता व सुव्यवस्थेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

     पाथरी पोलीस ठाण्यात बोलावलेल्या बैठकीत अहले सुन्नत वल जमातचे पदाधिकारी मौलाना हाफेज सय्यद गौस,

 सामाजिक कार्यकर्ते शेख खुर्शीद भाई, मौलाना हाफेज फरीद, मौलाना नुरी, माजी नगसेवक हनिफ खुरेशी, रियाज खुरेशी, मतीन खुरेशी, शकील खुरेशी, दिलशाद खुरेशी, अतीख खादरी, सय्यद इब्राहिम, अजीम भाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 या सभेला संबोधित करताना पाथरी पोलीस ठाण्याचे पी.एस.आय. जी.एन.कराड यांनी पाथरी पोलीस प्रशासनातर्फे पूर्ण बंदोबस्त करून मिरवणुकीला पाथरी पोलीस स्टेशन परवानगी देत असल्या बाबत बोलताना शांतता व सुव्यवस्था लक्षात घेऊन मिरवणूक काढण्याचे आवाहन केले.

 यावर आलेल्या सर्व जबाबदारांनी शांतता व सुव्यवस्थेची पूर्ण काळजी घेत मिरवणूक काढली जाण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाला दिले.

   या बैठकीला आमंत्रित करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार शेख खुर्शीद भाई यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना पाथरी शहरातील ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीचा इतिहास सांगितला व यावर्षी पण अतिशय शांततेत मिरवणूक काढली जाईल तसेच पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त केला जाईल असा आशावाद व्यक्त केला.

 सभेच्या शेवटी ग्रह खात्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल हिरक साहेब यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले.