दि.8 ः गेवराई येथील अंजली राठोड मृत्यू प्रकरणात चकलांबा पोलीसांनी तपासात निष्काळजीपणा केल्यामुळे औरंगाबाद खंडपीठाचे चकलांबा पोलीसांवर ताशेरे ओढले. तसेच सदरील तपास हा पोलीस पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेशित केले आहे.*
अंजना सुनिल राठोड (वय 28 रा. नृसिंह तांडा, ता. गेवराई) असे मयत विवाहीतेचे नाव आहे. आठ वर्षापुर्वी तिचा विवाह सुनिल राठोड यांच्याशी झाला होता. स्वयंपाक व शेती काम करता येत नाही या कारणावरुन अंजना यांचा जाच सुरु होता. 31 जुलै रोजी अंजनाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत शेतातील झाडावर लटकलेला आढळून आला. घटनेची माहिती अंजना यांचे वडिल बन्सी पवार यांना मिळाली. ते स्वतः घटनास्थळी पोहचले. चकलांबा पोलीसांना विनंती करुनही त्यादिवशी फिर्याद दाखल करुन घेण्यात आली नाही. घटनेच्या दुसर्या दिवशी पोलीसांनी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला. तपासी अधिकार्याने मुख्य आरोपी सुनिल राठोड याला ताब्यातही घेतले. परंतु पहिल्याच दिवशी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तपासामध्ये कसलीही प्रगती झाली नाही, असे आरोप फिर्यादी बन्सी पवार यांनी केले. थदनंतर फिर्यादी यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये अॅड.शशिकांत शेकडे यांच्यामार्फत तपासी अधिकारी बदलण्यासाठी याचिका दाखल केली. सदर याचिकेमध्ये पोलीस अधीक्षक यांनी तपासी अधिकारी यांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी उच्च न्यायालयात आदेशित केले. उच्च न्यायालय खंडपीठाचे न्यायमुर्ती विभा कनकनवाडी आणि न्यायमुर्ती राजेश पाटील यांनी सदर याचिका मान्य करून चकलांबा पोलीसांवर ताशेरे ओढले. उच्च न्यायालयाने सुनावणीनंतर पोलीसांनी तपास योग्य दिशेने केला नाही तसेच संबंधीत घटनास्थळावरुन कुठल्याही प्रकारचा पुरावा पोलीसांनी जमा केला नाही. तसेच सदरील घटनास्थळा हे गुन्हयाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित देवू शकते असे मत मांडले. तसेच हा तपास हा स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्याकडे सुपुर्द केला. पोलीस निरीक्षक यांनी सदर तपास हा पोलीस अधिक्षकांच्या निदर्शनाखाली लवकरात लवकर निपक्ष:पातीपणे पूर्ण करावा, असे आदेश देण्यात आले. या प्रकरणत फिर्यादीच्यावतीने अॅड.शशिकांत शेकडे यांनी उच्च न्यायालयात काम पाहिले.