रांजणगाव सांडस येथे आर्थिक व डिजिटल साक्षरता प्रशिक्षण शिबिर माजी सभापती सुजाता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. नाबार्ड व यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात प्रामुख्याने नवीन बँक खाते उघडणे, विमा संरक्षण, बँकेचे शैक्षणिक कर्ज, सोने तारण, गृह कर्ज इत्यादी योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी रांजणगाव सांडस येथील श्री दत्तकृपा महिला स्वयंसहाय्यता महिला बचत गट, साईकृपा स्वयंसहाय्यता महिला बचत गट, राजमाता अहिल्यादेवी स्वयंसहाय्यता महिला बचत गट, सिद्धनाथ स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांना सवलतीच्या व्याजदरात कर्ज वितरण करण्यात आले.
या वेळी संतोष तुकाराम रणदिवे, मा.उपाध्यक्ष रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना ,जीवन तांबे, मा.संचालक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज डेअरी,
निखिल सुभाष तांबे, संचालक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज डेअरी,
उत्तम लोखंडे, मा.सरपंच रांजणगाव सांडस,
सौ.संध्याताई रणदिवे, उपसरपंच रांजणगाव संडास,
सौ.संगीताताई शेलार, चेअरमन विकास सोसायटी वडगाव रासाई सचिन पवार, बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रणदिवे, मा.सरपंच अजित रणदिवे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी महेंद्र रणदिवे, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती अजित शितोळे मा.उपसरपंच पांडुरंग रणदिवे, मा.चेअरमन मारुती राक्षे, योगेश भोसले, अरुण पाटोळे, महिला बचत गटातील महिला वर्ग ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती.