बीड(प्रतिनिधी):-जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक प्रभाकरराव मानूरकर यांचे काल शनिवार दि.8 ऑक्टोबर रोजी दिर्घ आजाराने निधन झाले. पत्रकार संतोष मानूरकर यांचे ते वडिल आहेत.
गेल्या काही वर्षापासून कर्करोगाने ते आजारी होते. बीड येथील डॉ.अनिल बारकुल आणि डॉ.संतोष शिंदे यांच्याकडे उपचार सुरु होते. डॉ.शिंदे यांच्या लाईफ लाईन हॉस्पीटलमध्ये काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला.बीड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी,मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार संतोष मानूरकर आणि चंपावती विद्यालयाचे शिक्षक प्रकाश मानूरकर यांचे ते वडिल आहेत.मानूरकर गुरुजी यांच्या पार्थीवावर रविवार दि.9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता अमरधाम स्मशानभूमी मोंढा रोड येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.