वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये व वंचित बहुजन आघाडी युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा कार्यकारिणी च्या मुलाखती चे आयोजन वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा बीड जिल्हा निरीक्षक अमोल जी लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 8 ऑक्टोबर रोजी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये घेण्यात आल्या.

याप्रसंगी जिल्हा निरीक्षक अमोल लांडगे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, येथील प्रस्थापित राजकीय पक्षांनी वर्षानुवर्ष घराणे शाही जोपासण्याचे कार्य केल. येथील ओबीसी मायक्रो मायक्रो,भटके विमुक्त,यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळु दिले नाही. परंतु वंचित बहुजन आघाडी हा एकमेव राजकीय पक्ष असा आहे की,ज्याने लोकसभा विधानसभेमध्ये सर्वसामान्य वंचित उपेक्षित समूहात उमेदवारी दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले की गाव तेथे शाखा व घरोघरी वंचिता कार्यकर्ता हे अभियान अधिक तीव्र करण्यासाठी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर करून वंचितांचा हा लोक लढा अधिक मजबूत करावा असे आवाहन केले.

 या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पुरुषोत्तम वीर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.गणेश खेमाडे यांनी मानले. कार्यक्रमास वंचितचे जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे, युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते विष्णू देवकते सहसचिव मेजर अनुरथ वीर, दगडू गायकवाड,बालाजी जगतकर,अजय सरवदे,शेख युनूस, सौरभ थळकरी,निलेश बनसोडे गेवराई तालुकाध्यक्ष अजय गायकवाड,महासचिव किशोर भोले,बीड तालुका अध्यक्ष किरण वाघमारे बीड शहराध्यक्ष लखन काका जोगदंड यांचे सह वंचित चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.