पालम पंचायत समितीत महाअवास मेळावा
पालम प्रतिनिधी
ज्याप्रमाणे महाअवास योजनेत प्रथम आणि रमाई आवास योजनेत पालम तालुका दि्वीतीय स्थानी आहे, त्याप्रमाणे विकास कामांत देखील तालुका अग्रेसर राहण्यासाठी आपण सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे. म्हणून सुशिक्षीत बेरोजगारांसह शेतकरी, कष्टक-यांच्या उत्थानासाठी अनेक योजना आणून तालुक्यात विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याची ग्वाही आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिली.
पंचायत समितीच्या वतीने आयोजित महाअवास योजनेच्या लाभार्थी मेळाव्यात ते बोलत होते. 8 ऑक्टोंबर रोजी शनिवारी हा मेळावा तहसिल कार्यालयात झाला. उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील, रासप उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक गणेशराव रोकडे,मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे.अॅड संदीप अळनुरे,प्रभारी माधवराव गायकवाड.गटविकास अधिकारी उदय शिसोदे, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय निलपत्रेवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कालिदास निरस, महिला व बालविकास अधिकारी रेणूका येरमे, मित्र मंडळाचे तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष कृष्णा भोसले, मित्रमंडळाचे नारायण दुधाटे,उबेदखा रहीमतुलाखा पठाण .आजीम पठाण, असदुल्लाखाँ पठाण, गणेशराव घोरपडे, गणेश हत्तीहंबीरे, भगवान सिरस्कर, बाबासाहेब एंगडे यांच्यासह आदी उपस्थित होते. डॉ. गुट्टे पुढे म्हणाले की, तालुक्यात सुशिक्षीत बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामाध्यामातून युवकांना जास्तीत, जास्त रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. त्याप्रमाणेच शेतक-यांच्या पोटखराब जमीन लागवडीत समाविष्ठ करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. जेणेकरून तालुक्यातील लागवड क्षेत्रात वाढ होवून शेतक-यांना फायदा होईल. सध्या घरकुलाचे कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरीत कामे देखील पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. त्यांना मी सर्वोतपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही डॉ. गुट्टे यांनी दिली. तत्पूर्वी त्यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील 30 विद्यार्थ्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले. तसेच कोराना काळात 100 टक्के लसीकरन करणारे कर्मचारी तसेच तालुक्यातील उत्कृष्ठ तीन बचतगट, अंगणवाडी व आशाताई यांचा गौरव करीत विशेष घटक योजनेतंर्गत 3 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. पालम तालुका महाअवास योजनेत प्रथम तर रमाई योजनेत दुस-या स्थानी आहे. तरीही उर्वरीत घरकुलाचे काम पूर्ण करण्यात यावे. त्यासाठी मी आपसणास सर्वोतपरी मदत करणार असल्याचे अश्वासन डॉ. गुट्टे यांनी दिले. प्रारंभी खडी येथील वृद्ध कलावंतांच्या कलापथकाने स्वागतगीत सादर केले. शिसोदे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला वीविध गावातील लाभार्थी सरपंच ग्रामसेवक अंगणवाडी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते