चिपळूण : दरवर्षी प्रमाणे या वर्षी जिजाऊ ब्रिगेड समाजासाठी तसेच स्त्रियांसाठी अनेक त्रास सोसून जे महान कार्य केले त्या महान नाविकांचे नवदुर्गा यांचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली. चिपळूण शहरामधील समाजामध्ये

उल्लेखनीय काम करणाऱ्या तसेच मेहनत करून शिकणाऱ्या महिलांचा नवदुर्गा सन्मान चिपळूण तालुका जिजाऊ ब्रिगेडतर्फे करण्यात आला. या वेळी नुकतेच आपला व्यवसाय आणि घर सांभाळून झालेल्या वकील प्रतिज्ञा कांबळी, सामाजिक क्षेत्रामध्ये वयाची ६० किंवा त्यापेक्षा जास्त असताना हिररीने प्रत्येक समाजकार्यात भाग घेऊन २५ पेक्षा जास्त पुरस्कार घेऊन काम करीत राहाणाऱ्या आपल्या जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्य सीमाताई चाळके, तसेच चिपळूणमध्ये गेल्या वर्षी महापूर आला तेव्हा लोकांची घरे उधवस्त झाली होती. लोकांसाठी जीवाची पर्वा न करता त्यांना जेवण देणे नवीन कपडे देणे कोरोनामध्ये सुद्धा त्याना मदत करणे या कार्य करणान्या नवदुर्गा रविना गुजर तसेच पत्रकारिता विशेष प्रवीण आणि एबीपी माझा नंतर साम टीव्ही चॅनलवर वृत्त निवेदक म्हणून कार्यरत असणारी चिपळूणची कन्या नवदुर्गा ऋतुजा सतीश कदम, तसेच अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मजबूत पाऊल ठेवून यशस्वी असणाऱ्या नवदुर्गा चित्राताई चव्हाण या पाच दुर्गाचा सन्मान जिजाऊ ब्रिगेडतर्फे राजमाता जिजाऊची फ्रेम आणि गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. प्रत्येक नवदुर्गाने आपलं मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रस्तावना शहर अध्यक्ष स्मिताताई कदम यांनी केले. तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या मीनल गुरव यांनी एक नवरात्र गीत सादर करून कर्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच जिजाऊ ब्रिगेडमध्ये नवीन सदस्य प्रवेश करून घेण्यात आला.

जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष अनुजाताई भोसले, जिल्हा उपाध्यक्ष स्नेहल चव्हाण, जिजाऊ ब्रिगेड शहर अध्यक्ष ॲड. स्मिताताई कदम, शिवानीताई भोसले, अंजली कदम, चित्राताई चव्हाण, रविना गुजर, मीनल गुरव, पूर्वा अहिरे, गौरी कदम, सावर्डेकर आदी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा अध्यक्ष स्नेहल चव्हाण तसेच शहर अधक्षा ॲड. स्मिता कदम यांनी केले.