केज :- जश्ने ईद-ए-मिलाद दुन्नबी निमित्त केज पोलीस ठाण्यात मुस्लिम धर्मगुरुंची बैठक संपन्न झाली.
इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त दि. ९ ऑक्टोबर रोजी जश्ने ईद-ए-मिलाद दुन्नबी साजरी होत आहे. त्या निमित्त केज शहरातील मुस्लिम धर्मगुरूंची प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला रजा ॲकॅडमीचे जिल्हाध्यक्ष हाफिज खतीब मुखीमोद्दीन, हाफिज कुरेशी कलीम, हाफिज खतीब अमीर, हाजी कुरेशी सलीम, खारी समीर अन्सारी, इनामदार अफरोज, शेख अझीम, काझी युसूफ, खतीब मुबशीर आणि पोलीस कर्मचारी शेख मतीन हे उपस्थित होते.