राजापूर : केंद्र शासनार्मात स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील शहरांच्या स्वच्छतेबाबत नुकतेच सर्व्हेक्षण करण्यात आले होते. सन २०२२ च्या सर्व्हेक्षणात राजापूर नगर परिषदेने महाराष्ट्रातील १०५ शहरांमधून पाचवा क्रमांक पटकावला आहे. तर देशातील पश्चिम विभागामध्ये २७९ शहरांमधून सहावा क्रमांक संपादन केला आहे. यांच्या जोडीला राजापूर शहराला ओडीएफ प्लस प्लसचे मानांकन व वनस्टार रेटींग देखील प्राप्त झाले आहे. दरम्यान, मुख्याधिकारी प्रशांत भोसले व आरोग्य पर्यवेक्षिका सौ. श्रेया शिर्वटकर तसेच कर्मचारी, विशेषतः आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातून राजापूर शहराने लक्षवेधी यश मिळविल्याचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांनी सांगीतले. या यशासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे तसेच अभियानाला प्रतिसाद देणाऱ्या नाग रिकांचे मुख्याधिकारी भोसले यांनी अभिनंदन करून धन्यवाद दिले आहेत. गतवर्षीप्रमाणे सुरू वर्षातही या अभियानात सहभागी होऊन राजापूर शहराला अव्वल क्रमांक मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे.