राजापूर : तालुक्यातील पंचक्रोशी ग्रामविकास समितीची सर्वसाधारण सभा समिती अध्यक्ष अनिल भोवड यांच्या अध्यक्षतेखील मुंबईतील परेल येथे झाली. या सभेत नवीन समितीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी अनिल भोवड यांची फेरनिवड करण्यात आली. समितीचा कार्यकाळ हा २०२२ ते २०२५ या तीन वर्षांसाठी असून अध्यक्षपदी अनिल भोवड, कार्याध्यक्ष संदेश मिठारी, सरचिटणीस विश्वास राघव, खजिनदार अनिल राऊत, उपाध्यक्ष संतोष जोगले, सुरेश मेस्त्री, संतोष कुळ्ये, प्रकाश दळवी, सहचिटणीस प्रकाश बाईत, गजानन जाधव, संदीप नाचणेकर, आदेश शिंदे, रूपेश चौगुले, सुरेंद्र भातडे, सहखजिनदार दिलीप शिवगण, पर्शुराम परवडे, अंतर्गत हिशोब तपासणीस संतोष गोठणकर आदि कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीमध्ये ४० सदस्य असून प्रशासकीय, समन्वय, मिडिया समिती अशा विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. पंचक्रोशी ग्रामविकास समितीची स्थापना २००५मध्ये झाली असून समिती आपल्या अंतर्गत येणाऱ्या गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करते. पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर समितीत मोडणाऱ्या सर्व गावांच्या सर्वांगिण विकासासाठी आपली समिती कटिबध्द असल्याचे अध्यक्ष अनिल भोवड यांनी यावेळी सांगितले. नवनियुक्त कार्यकारिणीवर राजापूर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
દાહોદમાં ગ્રેજુએશન સેરેમનીનું આયોજન.
દાહોદમાં ગ્રેજુએશન સેરેમનીનું આયોજન.
NEWS :- Adani focuses on energy as his renewable firm's profit surges.
BIG NEWS :- Adani Green Energy Ltd., India’s top renewables company, saw net income in the...
परभणी तालुक्यातील मौजे उखळद, रहाटी, सावंगी खु., धसाडी, संबर, जोडपरळी
येथील अवैध रेती साठ्याचा जाहीर लिलाव
परभणी,दि.22 : परभणी तालुक्यातील मौजे उखळद येथील अंदाजे 3,692 ब्रास, मौजे रहाटी येथील अंदाजे 685...
ডিব্ৰুগড় বিশ্ববিদ্যালয়ত নামভৰ্তিৰ মাচুল বৃদ্ধি কৰাক লৈ মৰাণ মহাবিদ্যালয়ত ছাত্ৰ-ছাত্ৰীৰ প্ৰতিবাদ
নতুন শিক্ষাবৰ্ষ আৰম্ভণিৰ পূৰ্বে ডিব্ৰুগড় বিশ্ববিদ্যালয় কৰ্তৃপক্ষই মাচুল বৃদ্ধিৰ সিদ্ধান্ত...