शिरूर येथील रामलिंग मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त आमदार अशोक पवार यांच्या सौभाग्यवती, माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पवार यांनी दर्शन घेतले.
यावेळी सुजाता पवार यांनी दुपारची वेळ असल्याने दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांचे पाय भाजत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी मंदिर ट्रस्टींकडे रांगेत उभे असलेल्या भाविकांसाठी कार्पेट अंथरण्याची सूचना केली. ट्रस्टीने तात्काळ दखल घेत भाविकांसाठी कार्पेट अंथरण्याची व्यवस्था केली. त्यामुळे भाविकांना प्रसन्न चित्ताने दर्शनाचा आनंद घेता आला.
यावेळी रामलिंग देवस्थान ट्रस्टचे खजिनदार पोपटराव दसगुडे, माजी उपसभापती वाल्मिकराव कुरंदळे, रामलिंग देवस्थानचे ट्रस्टी जगन्नाथ पाचरणे, बलदेवसिंग परदेशी, बबनराव कर्डिले आदींची उपस्थिती होती.