रांजणगाव गणपती: दांडिया खेळताना किरकोळ कारणावरुन बचाबाची झाल्याने दोघांना फायटरने डोक्यात मारहाण करत गंभीर दुखापत केल्याप्रकरणी तीन जणांवर रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असुन याबाबत अमोल बापु ढसाळ (वय 20) याने फिर्याद दाखल केली आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार (दि 4) रोजी रात्री 10:30 च्या सुमारास रांजणगाव गणपती येथील काळुबाई मंदीर स्मशानभूमीजवळ नवरात्र उत्सवात दांडिया खेळताना फिर्यादी आणि आरोपी यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यामुळे यातील आरोपीनी फिर्यादी अमोल ढसाळ तसेच त्याचा मित्र अविनाश मोटे यांच्या डोक्यात टोकदार धारदार फायटरने जोरात मारत गंभीर दुखापत केली. त्यामुळे अमोल बापु ढसाळ रा रांजणगाव गणपती, नरवडे हॉस्पिटल जवळ ता.शिरुर जि.पुणे याने 1) संजीव बो-हाडे 2) प्रद्युत खुटेव व अन्य एकजण सर्व रा.रांजणगाव गणपती ता.शिरुर जि.पुणे यांच्या विरोधात रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

रांजणगाव गणपती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, उपनिरीक्षक विनोद शिंदे, निळकंठ तिडके यांनी तातडीने या घटनेचा तपास करत तीनपैकी संजीव बोऱ्हाडे आणि प्रद्युत खुटेव या दोन आरोपीना अटक करुन न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यांना शुक्रवार (दि 7) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास विनोद शिंदे करत आहेत.