औरंगाबाद : दि.७ ऑक्टों.(दीपक परेराव)अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज श्री क्षेत्र नाणीज धाम महाराष्ट्र यांचा पादुका दर्शन सोहळा आयोजित केला आहे. 

रविवार, दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना मुधळवाडी, पैठण रोड, ता. पैठण येथे हा सोहळा होईल.

या धार्मिक सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्व स्वरूप संप्रदाय भक्त सेवा मंडळ यांनी केले आहे.