दापोलीत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा सभेत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आपली ताकद दाखवण्यात आली,त्यानंतर लगेचच दोन दिवसांनी शिंदे गटानी दापोलीत सभा घेऊन आपलीही ताकद दाखवली.आता दापोलीत 10 ऑक्टोबरला पावरा गटाकडून आक्रोश मोर्चा व आंदोलनातून शक्तिप्रदर्शन होणार आहे.बोगस आदिवासींना नोकरीवरून काढा,सेवासंरक्षण देऊ नका,खोट्या जात प्रमाणपत्र धारकांवर गुन्हा दाखल करा व मूळ आदिवासी उमेदवारांना नोकरीवर घ्या.या मागणीसाठी बिरसा फायटर्स तर्फे दापोलीत 10 ऑक्टोबर 2022 रोजी मोर्चा व ठिय्या आंदोलन होणार आहे.
आपण रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य आदिवासी उमेदवार पदवीधर व उच्च शिक्षित आहेत. तरी चुकीच्या भरती प्रक्रियेमुळे हे उमेदवार बेरोजगार आहेत. भरती प्रक्रियेची साधी जाहीरात सुद्धा या उमेदवारांपर्यंत पोहचत नाही.त्यामुळेच विद्यापीठात स्थानिक आदिवासी उमेदवारांना नोकरीला लागणे म्हणजे त्यांच्यासाठी खूप लांबचीच गोष्ट आहे.म्हणून विद्यापीठात स्थानिक आदिवासी उमेदवारांना नोकरी भरतीत प्राधान्य द्या,जेणेकरून येथील आदिवासी समाज विकासाच्या प्रवाहात येईल, आदिवासी समाजाचे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. म्हणून शासनाने आदिवासी उमेदवारांसाठी विशेष भरती मोहीम प्रक्रिया राबवावी तसेच इतर मागण्यांकरिता आपण बिरसा फायटर्स संघटनेतर्फे दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी दापोलीमध्ये मोर्चा व प्रशासकीय कार्यालय कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे ठिय्या आंदोलन करणार आहात, असे आपल्या पत्रात नमूद केले आहे.
त्या अर्थी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 149 प्रमाणे अन्वये मला प्रधान अधिकाराचे अंतर्गत मी विवेक अहिरे पोलीस निरीक्षक दापोली पोलीस ठाणे याद्वारे आपणास नोटीस देत आहे की,आपण अगर आपले समर्थकांकडून सदर मोर्चात व ठिय्या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तसेच कोणत्याही दखलपात्र स्वरूपाचा अगर कोणतेही गैर कृत्य घडल्यास त्यासाठी तुम्हास वैयक्तिक रीत्या जबाबदार धरण्यात येईल व आर्थिक स्वरूपाचे नुकसानीचे भरपाईस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 51 चे तरतुदी अन्वये तुम्हास जबाबदार धरण्यात येवून आपणाविरूद्ध प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी,सदरची नोटीस माझे सही शिक्यानिशी देण्यात आलेली आहे.अशी मोर्चा व आंदोलनाबाबतची नोटीस सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांना विवेक अहिरे पोलीस निरीक्षक दापोली पोलीस ठाणे यांना दिली आहे.
बिरसा फायटर्स संघटनेतर्फे दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता दापोलीत आझाद मैदान पासून पोलीस ठाणे,उपविभागीय अधिकारी कार्यालय,पंचायत समिती दापोली,तहसिल कार्यालय मार्गे कोकण कृषी विद्यापीठ दापोली पर्यंत मोर्चा होणार आहे व दुपारी 1 वाजता कृषी विद्यापीठ दापोली समोर ठिय्या आंदोलन होणार आहे, या आंदोलनात आदिम आदिवासी कातकरी संघटनासुद्धा शामिल होणार आहे, अशी माहिती सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.