उभ्या पिकाची रान डुकरांकडुन नासाडी

"शेतकरी उपयोजना करून हतबल हजारो रुपयांचे नुकसान"

पाचोड(विजय चिडे) परिसरातील बहुतांश भागात रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे. तसेच हरणे देखील पिकांची नासाडी करू लागल्याने शेतकऱ्या मोठ्या अडचणीत पडला आहे. परिसरातील विविध चारा पिकांची रानडुकरे रात्रीतून मोठ्या नुकसान करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या उपाययोजना केल्या असल्या तरी हजारो रुपयाचे नुकसान शेतकऱ्यांचे दररोज होताना दिसून येत आहे.

जंगलाचे क्षेत्र सातत्याने घटत चालल्याने वन्यप्राणी मानवी वस्त्यांचा आश्रय घेत आहेत. हे प्राणी पाणी व चाऱ्याच्या शोधात सातत्याने फिरतात. या यांचे कळप शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी बनत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंतही शेतकर्‍यांना राखणीसाठी शेतातच थांबावे लागत आहे.परिसरातील सर्वच ठिकाणी अशाच प्रकारची स्थिती असल्याने शेतकर्‍यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. रानडुकाराच्या उपद्रवाने डोकेदुखी वाढली आहे.

पैठण तालुक्यात यंदा सुरूवातीलाच जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. परंतु पाचोड परिसरातील मुरमा येथील मुरलीधर निर्मळ यांच्या शेतामध्ये मध्ये बाजरी पेरणी झाले असून रानडुकरे या काढणीला आलेली पिकांची नासाडी केली आहे,या बाबतीत वन विभागाकडून बंदोबस्त करावा याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.अनेक उपयोजना करून देखील रानडुकर व हरणे रात्री शेतातमध्ये येऊन मालांची मोठ्या प्रमाणे नासाडी करत आहे.

यामुळे हाताशी आलेला घास या रानडुकरा सह जनावरांमुळे हिरावून घेतला जात आहे. या परिसरात रान डुकराचे आणि हरणानी अक्षरश धुमाकूळ घातला आहे.यामुळे वन विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे तसेच झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

फोटो काँप्शण- मुरमा ता.पैठण येथिल शेतात रानडुकरानी नासाडी केलेली बाजरी पिक"

छायाचित्रे;-विजय चिडे,पाचोड.