औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबईतील दसरा मेळावा संपल्यानंतर गावाकडे माघारी निघालेल्या ७५ वर्षीय महिलेला वैजापूर तालुक्यातील जरूळ शिवारात गुरुवारी पहाटे अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली . यात महिलेचा मृत्यू झाला . कमलबाई देवाजी पाठक ( रा . डिग्रस , ता . सिल्लोड ) असे मृत महिलेचे नाव असून त्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील आहेत . मेळाव्यानंतर सिल्लोडकडे निघालेल्या बसमध्ये कमलबाई यांच्यासोबत त्यांचा पुतण्या दिलीप भिवसन पाठक व इतर महिला होत्या . वैजापूरजवळील जरूळ फाटा येथे पहाटे ५.३० वाजता बसचालकाने लघुशंकेसाठी एसटी थांबवली होती . त्यादरम्यान महिला प्रवाशांसोबत कमलबाई खाली उतरल्या . रस्ता ओलांडताना त्यांना वैजापूरकडून शिऊरकडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने जोरदार धडक दिली . या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विजय नरवडे यांनी घटनास्थळी भेट दिली . कमलबाई यांना वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले . याप्रकरणी अज्ञात वाहनचालकांवर वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत शुभम पाचणकर प्रथम; प्रशांत शिंगाडे द्वितीय
परभणी: ता.18- वीर सावरकर विचार मंच यांच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय महाविद्यालयीन...
મહેસાણા યુવકની આંખમાં મરચું નાખી સોનાનો દોરો આંચકી લેનાર 3 ઝબ્બે
અંદાજે મહિના પૂર્વે મહેસાણા તાલુકાના પાંચોટ ગામના યુવકની આંખમાં મરચું નાખીને ગળામાંથી સોનાનો દોરો...
કોમર્સ કોલેજ ગોધરાની સાત દિવસીય શિબિરનો ધોળાકુવા ખાતે પ્રારંભ
વિકસિત ભારત @2047 અને મિલેટ અવેરનેસ ની થીમ પર આધારિત સાર્વજનિક કોમર્સ કોલેજ ગોધરાના એનએસએસ ની સાત...