वडवणी/प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती वडवणी येथे सामाजिक उपक्रम राबवुन मोठ्या उत्साहात व थाटात साजरी होणार.

वडवणी येथील संतसेना महाराज मंदिरात नाभिक समाजाचे जेष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले व या बैठकीत शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंतीनिमित्त विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.दि.१०ऑक्टो.सोमवार रोजी सकाळी १०वा.वडवणी तहसील तहसीलचे तहसिलदार मा.दत्ता भारस्कर साहेब यांच्या हस्ते शिवरत्न जिवाजी महाले चौकात भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण होईल.सकाळी ११:३० वा.वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहे. दुपारी १ वा. वडवणी पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सायं.५ वा.लोकशाहिर अण्णाभाऊ साठे चौक वडवणी येथे जिवा महाले यांच्या प्रतिमेचे पुजन वडवणी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा.आनंद कांगुणे साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणूकीस सुरुवात होईल.जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे मिरवणूक वाजत-गाजत अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संविधान चौक,वसंतराव नाईक चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, गोपीनाथराव मुंडे चौक ते मारुती मंदिर मार्गे श्री.संत सेना महाराज मंदिर येथे आरती करुन मिरवणूकीची सांगता होईल.

तरी वडवणी तालुक्यातील नाभिक समाज बांधवासह पत्रकार,वकिल,डॉक्टर,राजकीय,सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमास

उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.असे आवाहन शिवरत्न जिवाजी महाले जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.