सणसवाडी ते शिक्रापूर प्रवासा दरम्यान महिलेचे दागिने लांबविले

( शिक्रापूर प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरुर येथून शिक्रापूर येथे खाजगी वाहनाने प्रवास करणाऱ्या महिलेचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

                        सणसवाडी ता. शिरुर येथील रंजना यादव या पाच ऑक्टोबर रोजी सणसवाडी येथून शिक्रापूर येथे खाजगी वाहनाने प्रवास करत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने यादव यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची घटना घडली याबाबत रंजना कान्हू यादव वय ६५ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे या महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात इसमांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे करत आहे.